बेवारस मयताची ओळख पटविण्याचे आवाहन

 छत्रपती संभाजीनगर, दि.१४(जिमाका)-  सिटी चौक पोलीस ठाणे येथील नोंदीनुसार दि.५ मार्च रोजी दुपारी साडेचार वा.सुमारास खडकेश्वर मंदीर परिसरात पोलीस हेड कॉन्सटेबल शेळके व होमगार्ड भुईगळ यांना एक इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यांनी त्यास घाटी रुग्णालय येथे दाखल केले असता; त्या इसमास मयत घोषीत करण्यात आले.

मयताचे वर्णन – अंदाजे वय ३५ वर्षे, रंग – गोरा, केस – काळे, पोशाख – शर्ट व जीन्स ची पँट  

वरील वर्णनाच्या इसमाबाबत काही माहिती आढळल्यास पोलीस अंमलदार सिटी चौक पोलीस स्टेशन भालेराव मो.क्र. ९८२३१२८८४१वर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.  

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा