भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज मागविले

 छत्रपती संभाजीनगर, दि.४(जिमाका)- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी  भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविते, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील प्रवेशित व भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती व इतर ऑनलाईन योजनेसाठी पात्र असलेल्या अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाडिबीटी प्रणाली दि.३० जून पासुन सुरु झाली आहे. तरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय अनुदानित, विनाअनुदानित, कनिष्ठ, वरिष्ठ, व्यावसायिक, बिगर व्यावसायिक, महाविद्यालयातील प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयातील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे  सहायक आयुक्त, समाजकल्याण आर.एम.शिंदे यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा