‘विकसित महाराष्ट्र २०४७’ सर्व्हेक्षण जनसहभाग वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाची विशेष मोहीम
छत्रपती संभाजीनगर, दि.१५(जिमाका)- राज्यशासनामार्फेत राबविण्यात येत असलेल्या ‘विकसित महाराष्ट्र २०४७ या सर्व्हेक्षणात छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रथम येण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने आपला सहभाग नोंदवावा,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. त्यासाठी विविध घटकांमध्ये जाऊन विशेष मोहिम राबविण्याचे निर्देशही दिले आहेत.
राज्यशासनाच्या निर्देशानुसार विकसित महाराष्ट्राचे चित्र
कसे असेल याचा भविष्यवेध घेणारे ‘विकसित महाराष्ट्र २०४७’, असे व्हिजन डॉक्युमेंट महाराष्ट्र शासन तयार करत आहे. हा राज्याच्या शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाचा
आराखडा असेल. हा आराखडा तयार करतांना सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा, आकांक्षा, विचार
व समस्या समजुन घेण्यासाठी हे नागिरक सर्व्हेक्षण आयोजीत केले जात आहे. तसेच त्यासाठी
७ सोपे प्रश्न विचारले जात आहे. नागरिकांना या सर्वेक्षणात पर्याय निवडुन आपले विचार
लिहुन किंवा आवाज रेकॉर्ड करून या लिंकवर
https://wa.link/o93s9m जाऊन दि १७
जुलै २०२५ पर्यंत सहभाग नोंदविता येणार आहे.
ही मोहीम जिल्ह्याच्या प्रत्येक भागात / क्षेत्रात पोहोचवण्यासाठी
विविध गटांमार्फत संपर्क केला जाणार आहे. त्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, आंगणवाडी
सेविका, आशा वर्कर्स, कृषि सहायक यांनी ग्रामपातळीवर नागरीकांना सर्वेक्षणासाठी प्रोत्साहीत
करावे. सर्व शासकीय ,निमशासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांचा वैयक्तिक सहभाग नोंदविणे आवश्यक आहे.सर्व कनिष्ठ
व वरीष्ठ महाविद्यालये. विद्यार्थी व तरुण वर्ग यांचा सक्रीय सहभाग, सर्व पोलीस अधिकारी
व कर्मचारी वृंद,सर्व सामाजिक संघटना, स्वंयसेवी संघटना, बचतगट, शेतकरी उत्पादक संस्था
(FPO), आदिवासी बचतगट, सहकारी संस्था, मच्छिमार सहकारी संस्था, सर्व कृषि उत्पन्न बाजार
समित्या, दुध उत्पादक संघ, नगर परिषद मुख्याधिकारी व शहरी प्रशासनाचे सक्रीय सहकार्य,स्थापत्य
अभियंते, डॉक्टर्स,डॉक्टर्स असोसिएशन, शिक्षक संघटना, उद्योजक संघटना, सामाजिक संस्था
,रोटरी क्लब, रोटरॅक्ट क्लब, लॉयन क्लब, इ. या सर्व्हेक्षणात सहभाग नोंदवावयाचा
आहे.
या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यातील प्रत्येक घटकाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवणे आणि जिल्हा विकास प्रक्रियेत
सर्वांचा सहभाग सुनिश्चित करणे होय.’चला, ऊर्जा, समन्वय आणि दृष्टीकोनासह पुढे जाऊ
या — ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साकार करूया!’,
असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment