जिल्हा ग्रंथालय व अभ्यासिका सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

                  छत्रपती संभाजीनगर, दि.४(जिमाका)- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,छत्रपती संभाजीनगर या कार्यालयामार्फत ग्रंथालय, अभ्यासिका या सेवा दिल्या जातात. या सेवांचा संस्थेत येऊन विनामूल्य लाभ घेता येतो तसेच सभासद होऊन घरी पुस्तके नेऊन सशुल्क लाभ घेता येतो. या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सु. धों.साबळे यांनी केले आहे.

            जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाचे २६, ग्रंथालय सदन, राधामोहन कॉलनी, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे ग्रंथालय अभ्यासिका आहे. ग्रंथालयात कथा, कादंबरी, काव्यसंग्रह, संदर्भ ग्रंथ, स्पर्धा परीक्षाविषयक ग्रंथ व  विविध विषयांवरील दर्जेदार अशी १७ हजार ९५४ ग्रंथ उपलब्ध असुन दैनिके, नियतकालिके इतर वाचनीय साहित्य उपलब्ध आहे. स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  अभ्यासिका   देखील असुन वाचक विद्यार्थी  ग्रंथालयात बसुन ग्रंथ, दैनिके नियतकालिकांचे मोफत वाचन करुन शकतात.

                               ग्रंथ घरी घेवुन वाचन करावयाचे असल्यास ग्रंथालयाचे सभासद होणे आवश्यक आहे. वैयक्तिक सभासदाप्रमाणेच  वाचन संस्कृतीचा प्रचार प्रसार करणारी जिल्हयातील कुठलीही नोंदणीकृत संस्था जिल्हा ग्रंथालयाची संस्था सभासद होऊ शकते. जिल्हा ग्रंथालयाचे वैयक्तिक सभासद होणेकरीता  अनामत रक्कम   ५०० रुपये (परतावा) तर  अर्ज प्रवेश शुल्क  ११० रुपये (व्दिवार्षिक), तसेच  संस्था सभासद होणेसाठी अनामत रक्कम २५०० रुपये (परतावा) अर्ज   प्रवेश शुल्क ७७५ रुपये (व्दिवार्षिक) इतके आहे.तरी  विद्यार्थी,  नागरीकांनी  ग्रंथालयाचे सभासद होवुन वाचन सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सु. धों.साबळे यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा