नालसा वीर परिवार सहाय्यता योजना - 2025 अंतर्गत माजी सैनिक व वीर पत्नींसाठी मोफत कायदेशीर सेवा केंद्र स्थापन

 छत्रपती संभाजीनगर, दि. 8 (जिमाका) – नालसा वीर परिवार सहाय्यता योजना - 2025 योजनेअंतर्गत माजी सैनिक, वीर पत्नी  यांच्यासाठी सर्व प्रकारचे कायदे विषयक सल्ले आणि मार्गदर्शन विनामुल्य दिले जाणार आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश गिरीश आर. अग्रवाल यांच्या मार्गदर्शानाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्रीमती वैशाली पी. फडणीस यांच्या हस्ते जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कायदेशीर सेवा केंद्र स्थापित करण्यात आले आहे. या योजनेचा जास्तीत माजी सैनिक,  वीर पत्नी  अवलंबित्व यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन  जिल्हा व सत्र न्यायाधीश गिरीश आर. अग्रवाल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्रीमती वैशाली पी. फडणीस व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) मेजर एस फिरासत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 0240- 236778, 0240 -2370313 भ्रमणध्वनी क्रमांक 8591903620  तसेच नालसा वीर परिवार सहाय्यता हेल्पलाईन क्रमांक 15100 देखली विनामुल्य विधी सहाय्यता संपर्क करण्यात यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा