अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचतगटांना मिनी ट्रॅक्टर; अर्ज मागविले

  छत्रपती संभाजीनगर,दि.४ (जिमाका) -  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना ९० % अनुदान मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करणे ही योजना राबविण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी इच्छुक अनूसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या महीला, पुरुष बचत गटांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण या कार्यालयातून अर्ज प्राप्त करुन परीपूर्ण प्रस्ताव दि.७ ऑगस्ट  पर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन समाज कल्याण विभागची सहायक आयुक्त समाज कल्याण यांनी केले होते.

योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचया स्वयंसहाय्यता बचत गटांना ९ ते १८ अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने (कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर) खरेदी करण्यासाठी ३ लाख ५० हजार रुपये कमाल मर्यादेत ९० टक्के  शासकीय अनुदान व १० टक्के स्वयंसहाय्यता  बचत गटाचा हिस्सा अर्थसहाय्य केले जाते.

योजना राबविणे मागची उदिष्टे

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना ९० % अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरीता ही योजना सुरु करण्यात आली आहे.

लाभाचे स्वरुप

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचया बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरीता ३ लाख १५ ह्जार रुपयांची आर्थिक मदत.

अटी व शर्ती

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचया स्वंयसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे  रहिवासी असावेत.

स्वयंसहाय्यता बचत गटातील सर्व सदस्य (100 %)  अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत.

स्वयंहाय्यता बचत गटातील अध्यक्ष, सचिव, अनुसूचित जाती प्रवर्गातील असावेत.

ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधानांचया खरेदीवर रुपये 3.15 लाख शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.

ठरवून दिलेल्या उदिष्टापेखा आर्थिक अर्ज प्राप्त झाल्यास पात्र बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल.

स्वयंसहाय्यता बचत गट नोंदणीकृत असावा.

सर्व सदस्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी, उत्पन्नाचा दाखला अनिवार्य आहे.

स्वयंसहाय्यता बचत गटाचे नोदंणीकृती असावा.

सर्व सदस्यांचे आधार कार्ड, पॅनकार्ड, रहिवासी, उत्पनाचा दाखला अनिवार्य आहे.

 स्वयंसहाय्यता बचत गटाचे नॅशनलाईज बँकेत, बँकखाते असने अनिवार्य आहे.

 स्वयंसहाय्यता बचत गटाची सर्व सदस्यांची यादी बँककडून प्रमाणित करुन घ्यावी.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या महिला, पुरुष बचत गटांनी सहायक आयुक्त, समाजकल्याण, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयात दि.७ ऑगस्ट पर्यंत कार्यालयीन वेळेत हजर राहून सर्व अटींची पूर्तता करुन प्रस्ताव सादर करावा. दि.७ ऑगस्ट नंतर कोणत्याही प्रस्तावाची त्रुटी पुर्तता करुन घेण्यात येणार नाही  व तदनंतर कोणतीही तक्रार ग्राह्य धरण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी,असे सहायक आयुक्त समाज कल्याण यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा