महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची बीज भांडवल कर्ज योजना; अर्ज मागविले

 छत्रपती संभाजीनगर,दि.७(जिमाका)- महात्मा फुले मागास विकास महामंडळाच्या वतीने अनुदान, वीज भांडवल व थेट कर्ज योजनेअंतर्गत  कर्ज दिले जाते. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी या योजनेअंतर्गत  जिल्ह्याला ९० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.  तर थेट कर्ज योजनेसाठी (१ लाख रुपये मर्यादा) ३२ कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील इच्छुक अर्जदारांनी आपले अर्ज सप्टेंबर २०२५ अखेर  महामंडळाच्या http://mahadisha.mpbcdv.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ , छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा