इस्त्राईलमध्ये रोजगाराची संधी

             छत्रपती संभाजीनगर, दि.१२(जिमाका)- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्यातील कुशल युवक-युवतींना परदेशातील रोजगार संधी उपलब्ध करून देण्याकरीता महाराष्ट्र इंटरनॅशनल हे वेबपोर्टल सुरू करण्यात आले आहे.             सद्यस्थितीत इस्त्राईल देशात होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स या  पदाकरिता मासिक वेतन १ लाख ६१ हजार ५८६ रुपये सह रोजगाराची संधी उपलब्ध आहे. याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त राजू वाकुडे यांनी केले आहे.

पात्रता -

        इस्त्राईल देशात नोकरीसाठी उमेदवारांकडे होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स या पदासाठी आवश्यक असलेले भारतातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेद्वारा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट आणि मिडवाइफरी या क्षेत्रातील किमान ९९० तासांचा (ऑन जॉब ट्रेनिंगसह) अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. जी.डी.ए./ए.एन.एम./जी.एन.एम./बी.एस.सी. नर्सिंग या क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवारही सदर पदासाठी पात्र आहेत.

        उमेदवारांना इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

        उमेदवारांचे वय २५ ते ४५ वर्ष असावे.

      उंची किमान ५ फूट / वजन किमान ४५ किलो असावे.

अर्ज कसे करावेत -

जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन सदर पदाचे कार्यविवरण, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया याबाबत माहिती घ्यावी.  तसेच इच्छुक उमेदवारांनी सदर वेबपोर्टलवरील लिंक द्वारा आपला अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मालजीपुरा, स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा या कार्यालयाच्या ०२४०-२९५४८५९ या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा