जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
छत्रपती संभाजीनगर, दि.१५(जिमाका)-देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, डॉ. सुचिता शिंदे, प्रवीण फुलारी, देवेंद्र कटके, एकनाथ बंगाळे, संगिता सानप तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी –कर्मचारी उपस्थित होते.
०००००



Comments
Post a Comment