इमाव विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह प्रवेशसाठी सुधारीत वेळापत्रक जाहिर

 


छत्रपती संभाजीनगर, दि. 20 (जिमाका) –  इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी व वसतीगृह योजनेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रबाई फुले आधार योजनेसाठी https://hmas.mahait.org शासनाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर अर्ज मागविण्याबाबत वेळापत्रक निश्चित झाले आहेत.

बी.ए., बी.कॉम, बी.एस.सी, अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम ए एम एस सी असे पदवी नंतरचे पदव्यूत्तर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून)- अर्ज करावयाचा कालावधी दि.17 ते 27 ऑगस्ट, अर्ज छाननी - दि.28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर, पहिली निवड यादी गुणवत्तेनुसार अंतिम व प्रसिद्ध करणे दि. 3 सप्टेंबर, पहिल्या निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत दि. 12 सप्टेंबर, रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे दि.15 सप्टेंबर, दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची अंतिम मुदत दि.23 सप्टेंबर पर्यंत राहील.

शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर योजनेसाठी पात्र असणाऱ्या विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org  शासनाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर अर्ज भरावे असे आवाहन सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा