पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा शुक्रवारी(दि.८)
छत्रपती संभाजीनगर,दि.६(जिमाका)- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने तसेच इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलंस इन इंजिनियरींग ॲड मॅनेजमेंट (ICEEM) शुक्रवार, दि.८ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा
गट नं. ४ बजाज ऑटो लि. समोर, छत्रपती संभाजीनगर – पुणे नगर रोड एम. आय. डी. सी. वाळूज
येथे होणार आहे. मेळावा सकाळी साडेनऊ वा. सुरुवात
होईल. या रोजगार मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी
सहभागी होणार असून, ते थेट मुलाखती घेणार आहेत.
नामांकीत कंपन्यांचा सहभाग
मेळाव्यात
बीजी-ली-ईन इलेक्ट्रिकल्स लि., मेटलमन ऑटो लि., सुदर्शन सौर शक्ती प्रा.लि.,उमासन्स
ऑटो कॉम्प प्रा.लि., पगारीया ऑटो प्रा.लि., औरंगाबाद ऑटो ॲन्सीलरी प्रा.लि., अश्पा
ग्लोबल सर्व्हिसेस प्रा.लि., रत्नप्रभा मोटर्स
महिंद्रा, साई सु्प्रिम इक्युपमेंट, एलीगंट कोटिंग प्रा.ली., समर्थ इलेक्ट्रोकेअर प्रा.ली.,
टेस्टी बाईट, पूणे, अलंकार इंजिनीअरींग ईक्युपमेंट प्रा.लि सहभागी होणार आहे.
८४० रिक्त पदे
या रोजगार
मेळाव्यात ८४० रिक्त पदांसाठी कोणत्याही शाखेची पदवी, इंजिनिअरिंग, डिप्लोमा, आय. टी.
आय., बारावी (HSC), दहावी (SSC) उत्तीर्ण अशा विविध शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेच्या
उमेदवारांची भरती केली जाणार आहे.
ऑनलाईन नोंदणी सुविधा
उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या शासनाच्या संकेतस्थळावर रोजगार नोंदणी करून,
युजर आयडी व पासवर्डद्वारे लॉगिन करून ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करताना काही अडचण आल्यास
०२४०-२९५४८५९ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत
संपर्क साधावा.
पात्र उमेदवारांनी शुक्रवार दि.८ रोजी
सकाळी साडेनऊ वा. कार्यक्रमस्थळी उपस्थित रहावे व विविध नियोक्त्यांकडे थेट मुलाखती
देवून रोजगाराची संधी मिळवावी, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार
व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सुरेश वराडे यांनी केले आहे.
०००००

Comments
Post a Comment