हैद्राबाद इनामे व रोख अनुदाने रद्द अधिनियमांतर्गत जमिनींच्या वर्ग बदलासाठी शिबीरात सहभाग घ्यावा

 


छत्रपती संभाजीनगर, दि. 22 (जिमाका) –महाराष्ट्र शासनाने दि. 15 जुलै रोजी जारी केलेल्या शासन परिपत्रकानुसार हैद्राबाद इनामे व रोख अनुदाने रद्द अधिनियम 1954 अंतर्गत येणाऱ्या मदतमाश जमिनी भोगवटादार वर्ग – 2 मधून वर्ग – 1 मध्ये रुपांतरीत करण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. ही प्रक्रिया आता महसुल विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

यापूर्वी या प्रक्रियेसाठी 50 टक्के नजराणा आकारला जात होता. यामध्ये शासनाने सुधारणा करून तो आता केवळ 5 टक्के निश्चित केला आहे. या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा कायमस्वरूपी हक्क वर्ग – 1 मध्ये मिळविणे शक्य होणार आहे.

या साठी छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.या शिबिरात पात्र शेतकऱ्यांनी  लाभ घ्यावा, असे आवाहन पैठण - फुलंब्री उपविभागीय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. अधिक माहितीसाठी व आवश्यक कागदपत्रांसाठी संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याशी संपर्क साधवा. असे कळविले आहे.

00000

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा