ओबीसी महामंडळाच्या थकबाकीदार कर्जदारांनी एकरकमी परतफेड योजनेचा लाभ घ्यावा

 


छत्रपती संभाजीनगर, दि. 20 (जिमाका) –  महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत   जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील गरजू लाभार्थींना स्वयंरोजगारासाठी अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या महामंडळाने आता थकबाकीदार कर्जदारांना दिलासा देण्यासाठी एकरकमी परतफेड (One Time Settlement - OTS) योजना जाहीर केली आहे.

या योजनेअंतर्गत, थकबाकीदार कर्जदार त्यांच्या कर्जाच्या थकबाकीची एकरकमी परतफेड करून व्याजदरावर 40% सूट मिळवू शकतात. ही योजना 31 मार्च 2026 पर्यंत लागू राहील. या संधीचा फायदा घेऊन सर्व संबंधित कर्जदारांनी आपली कर्जे फेडून कर्जमुक्त व्हावे असे आवाहन महामंडळाने केले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि कर्जाची संपूर्ण माहिती साठी, कर्जदारांनी जिल्हा कार्यालय, जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क करावा. अधिक माहितीसाठी 0240- 2349544 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

ही योजना कर्जदारांसाठी एक सुवर्णसंधी असून, याचा लाभ घेऊन आपली आर्थिक जबाबदारी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक  जे. झेड .राठोड यांनी  प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा