वाहतूक मार्गात बदल
छत्रपती संभाजीनगर, दि.2 (जिमाका)- हजरत शेख मुन्तजबोद्दीन जर जरी बक्ष यांचा 739 वा उर्स महोत्सव दि. 1 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान खुलताबाद येथे होत आहे. या कालावधीत वाहतुकेची कोंडी निर्माण होऊ नये यासाठी खुलताबादला जाणारी व येणारी जड वाहतूक मार्गात बदल करण्यात येत असल्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड यांनी निर्गमित केले आहेत.
वाहतुक मार्गातील बदल याप्रमाणे-
1. कन्नड – वेरुळ – खुलताबाद – दौलताबाद
– छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहतूक - कन्नड – वेरुळ – कसाबखेडा फाटा – वरझडी –
माळीवाडा – शरणापूर फाटा – मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे या मार्गाने जाईल
2. छत्रपती संभाजीनगर – दौलताबाद – खुलताबाद – वेरुळ –
कन्नडकडे जाणारी वाहतूक- छत्रपती संभाजीनगर – शरणापूर फाटा – माळीवाडा – वरझडी – कसाबखेडा
फाटा – वेरुळ मार्गे कन्नड कडे जाईल.
3. फुलंब्री – सुलतानपुर – खुलताबाद – वेरुळ – कन्नड कडे
– जाणारी वाहतूक फुलंब्री – छत्रपती संभाजीनगर – शरणापूर फाटा – माळीवाडा – वरझडी
– कसाबखेडा फाटा – वेरुळ मार्गे कन्नडकडे जाईल,असे कळविण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment