भगवान बाबा बालिकाश्रमास उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे आणि महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट

 


छत्रपती संभाजीनगर, दि.१८(जिमाका) - विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज छत्रपती संभाजीनगर, सातारा परिसर येथील भगवान बाबा बालिका  आश्रमास भेट देऊन येथील मुलींना मिळणाऱ्या सेवा सुविधांची पाहणी केली.

त्यांच्या समवेत पोलीस आयुक्त प्रवीण पवार,महिला बालविकास अधिकारी गणेश पुंगळे तसेच जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय आणि विभागीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी,भगवान बाबा बालिका आश्रमाच्या संचालिका कविता वाघ यावेळी उपस्थित होत्या.

            यावेळी त्यांनी मुलींशी  संवाद साधत बालगृहातील अडचणी जाणून घेतल्या. बालगृहातील मुलींनी आपल्या कलागुणातून साकार केलेल्या पेंटिंग्स आणि फ्रेम याविषयी माहिती दिली. मंत्री अदिती तटकरे तसेच नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. मुलीशी संवाद साधून कौतुकाची थाप दिली. यावेळी श्रीमती तटकरे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांशी तसेच पत्रकारांशी संवाद साधला.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा