अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचतगटांना मिनी ट्रॅक्टर; लाभार्थी निवड शुक्रवारी (दि.२६)

 छत्रपती संभाजीनगर,दि.२३(जिमाका)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना ९०%  अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करणे ही  योजना राबविण्यात येते.  या योजनेसाठी सन २०२३- २४ मधील पात्र ६५ लाभार्थ्यापैकी सोडत पद्धतीने ४५ लाभार्थ्यांची निवड शुक्रवार दि.२६ रोजी दुपारी साडेबारा वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा छत्रपती संभाजीनगर येथील सभागृहात होणार आहे. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन सहायक आयुक्त रविंद्र शिंदे यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा