उद्योगमंत्री उदय सामंत यांची अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची पाहणी

 













छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका)- जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज सकाळी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. आ. विलास भुमरे, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड हे याप्रसंगी उपस्थित होते. अंबिकापूर ता. छत्रपती संभाजीनगर येथील मोसंबी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेताची त्यांनी पाहणी केली. अतिवृष्टीमुळे मोसंबी सारखे फळपिक आणि ऊस पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन उभे आहे,असे त्यांनी सांगितले. तसेच यंत्रणेला त्वरीत पंचनाम्यांचे काम पूर्ण करावे असे निर्देशही दिले. त्यानंतर श्री. सामंत हे जालना जिल्ह्यातील भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा