नवरात्रीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महिला सक्षमीकरण उत्सव
छत्रपती संभाजीनगर, दि.२३(जिमाका)- नवरात्रोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरण अभियान ‘उत्सव नवरात्रीचा, उत्सव स्त्री शक्तीचा’ राबविण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या नियोजन सभागृहात हा कार्यक्रम आज सुरु झाला. या अंतर्गत महिला
सुरक्षितता,आरोग्य महिलांचे, प्रशासन, आर्थिक सक्षमीकरण, वक्तृत्व स्पर्धा, महिला
बालविकास विभागाच्या योजना, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या योजना आणि सांस्कृतिक
पर्व असे विविध कार्यक्रमआगामी आठ दिवसात आयोजीत करण्यात आले आहेत. आज या
कार्यक्रमाचा प्रारंभ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात
आला. पोलीस आयुक्तालयातील सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक कदीर देशमुख, जिल्हा
शिक्षणाधिकारी माध्यमिक आश्विनी लाटकर, उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे, संगिता राठोड,
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दराडे आदी उपस्थित होते.
जिल्हा
माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने आपल्या भाषणात, स्त्री राज्याचा इतिहास सांगत,
घटस्थापना व नवरात्रोत्सवामागील परंपरेचा इतिहास सांगितला. कदीर देशमुख यांनी सायबर
सुरक्षा याविषयी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी स्वामी यांनी
महिलांनी या उत्सव काळात आयोजीत या कार्यक्रमांचा लाभ घेऊन विविध विषयांवरील माहिती
प्राप्त करुन घ्यावी,असे आवाहन केले.
सूत्रसंचालन
व आभार प्रदर्शन डॉ. मीरा ढास यांनी केले.
०००००






Comments
Post a Comment