‘म्हाडा’सदनिका सोडत बुधवारी (दि.१ ऑक्टोंबर)

  छत्रपती संभाजीनगर,दि.२६(जिमाका) – छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत १४०८ सदनिका, भूखंड गाळ्याकरीता दि.३० जून रोजीच्या विविध वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आली होती. जाहिराती अन्वये ऑनलाईन पद्धतीने अद्यावत अशा नवीन एकात्मिक लॉटरी प्रणाली अंतर्गत ७८८१ अर्जांची ऑनलाईन संगणकीय नोंदणी झाली आहे. अर्जाची संगणकीय सोडत बुधवार दि.१ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वा.जिल्हा नियेाजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.  या संगणकीय सोडतीचे उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते होणार आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा