बेवारस मयताची ओळख पटविण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि.10 (जिमाका) - वेदांत नगर पोलीस ठाणे येथील नोंदीनुसार दि.30 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वा. सुमारास गुरु ग्लास दुकान समोर पद्मपुरा येथे पोलीस हेड कॉन्सटेबल ठाकूर यांना एम इसम बेशद्ध अवस्थेत आढळून आला. त्यांनी त्यास घाटी रुग्णालय येथे दाखल केले असता, त्यास इसमास मयत घोषीत करण्यात आले.
मयताचे वर्णन – अंदाजे वय 40 ते 45 वर्ष, रंग – गोरा,
नाक – बसके, डोळे – काळे, केस – काळे पांढरे, अंगात कपडे – पँन्ट व शर्ट, (निळया
रंगाचा शर्ट काळी पॅन्ट) चेहरा – लांबट, उंची – पाच फुट चार इंच
वरील वर्णनाच्या इसमाबाबत काही माहिती आढळल्यास पोलीस
ठाण वेदांतनगर पोह / 894 पी.जे.चोपडे संपर्क क्रमांक 7722008694 यावर संपर्क
साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment