इमाव विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वसतीगृह; प्रवेश प्रक्रिया सुरु

 छत्रपती संभाजीनगर, दि.२४(जिमाका) - इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना वसतीगृह प्रवेश मिळू शकत नाही अशांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती  सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी  अर्ज मागविण्याचे वेळा पत्रक निश्चित झाले आहे, असे सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण दत्तात्रय वाघ यांनी कळविले आहे.

अर्ज करण्याची पद्धती व वेळापत्रकः-

इच्छुक अर्जदारांनी  https://hmas.mahait.org    या संकेतस्थळावर अर्ज करावयाचा आहे. त्यासाठी १२ वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले तसेच पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले (बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) विद्यार्थ्यांनी दि.१९ ते २९ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करावा. अर्ज छाननी दि.३० सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होईल. पहिली निवड यादी दि. ६ऑक्टोंबर रोजी प्रसिद्ध होईल. त्यानुसार दि.१६ ऑक्टोंबर पर्यंत प्रवेशासाठी अंतिम मुदत असेल. तर रिक्त जागेवर प्रवेशासाठी दुसरी यादी दि.१७ ऑक्टोंबर रोजी प्रसिद्ध होईल. दुसऱ्या निवड यादीतील प्रवेशासाठी दि.३१ऑक्टोंबर ही अंतिम मुदत असेल.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा