अवैध दारु उत्पादन व विक्री प्रतिबंध आढावा समिती; इच्छुकांकडून अर्ज मागविले

 छत्रपती संभाजीनगर, दि.१०(जिमाका)- अवैध दारू उत्पादन व विक्री प्रतिबंधाचा आढाव घेण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत  करण्यात येणार आहे. त्यासाठी शासन निर्णयातील तरतुदीनुसार पात्र इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले असल्याचे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी कळविले आहे.

गृह विभागाच्या शासन निर्णय दिनांक १६ मे २०१७ नुसार अवैध दारूच्या उत्पादन व विक्री प्रतिबंधाबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याची तरतूद आहे. या समितीतील अशासकीय सदस्यांची रिक्त असलेले पदे भरण्यात येणार आहेत. या समितीमध्ये स्वंयसेवी संस्था प्रतिनिधी (दोन सदस्य) अनुसूचित जाती महिला प्रतिनिधी (एक सदस्य) अनुसूचित जमाती महिला प्रतिनिधी (एक सदस्य) व्यसनमुक्ती संस्थाचे प्रतिनिधी (दोन सदस्य ) या सदस्यांची निवड करण्यात येते. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून संबंधित इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी इच्छुक आणि पात्र व्यक्तींनी अधीक्षक कार्यालय राज्य उत्पादन शुल्क या कार्यालयात बातमी प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत अर्ज सादर करावेत,असे आवाहन अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा