अवैध दारू प्रतिबंध जिल्हास्तरीय समिती अशासकीय सदस्यांची नियुक्ती, अर्ज मागविले
छत्रपती संभाजीनगर, दि. 9 (जिमाका) - अवैध दारूच्या प्रतिबंधासाठी
आणि अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समिती गठीत
करण्यात येणार आहे . शासनाच्या दिनांक 16 मे 2016 च्या निर्णयानुसार ही समिती
स्थापन करण्यात येते. या समितीतील अशासकीय सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.
ही समिती अवैध दारू विक्री आणि उत्पादन
रोखण्यासाठी काम करेल. समितीमध्ये विविध सामाजिक क्षेत्रातील सदस्यांचा समावेश केला
जाईल. समितीमध्ये स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी (दोन सदस्य), अनुसूचित जाती (महिला) प्रतिनिधी (एक सदस्य),अनुसूचित
जमाती (महिला) प्रतिनिधी (एक सदस्य),व्यसनमुक्ती संस्थांचे प्रतिनिधी (दोन सदस्य)
या सदस्यांची निवड करण्यासाठी अर्ज मागविण्यात
आले आहे. इच्छुक आणि पात्र व्यक्तींनी अर्ज
सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment