आंतरजातीय विवाह; जोडप्यांना ५० हजार रुपये अनुदान

 छत्रपती संभाजीनगर, दि.१९(जिमाका) – आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत विवाहित जोडप्यास ५० हजार रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जोडप्यापैकी एक व्यक्ति अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्गातील असावी व दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, जैन. लिंगायत, बौद्ध, शिख असावी. ही योजना या जातींमधील आंतर प्रवर्गासही लागू आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, वर वधू यांचा फोटो, शासकीय कार्यालयात विवाहाची नोंद केलेले विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दोघांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र त्यावर जातीची नोंद आवश्यक, जातीचे प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, वर्तणूकीबाबत प्रतिष्ठित व्यक्तिंचे शिफारस पत्र, दोघांचे शपथ पत्र, रहिवासी प्रमाणपत्र,  आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बॅंकेचे संयुक खाते इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा