पैठण रस्त्यावरील रहदारीसाठी पर्यायी वाहतुक मार्ग
छत्रपती संभाजीनगर, दि.६(जिमाका)- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ इ छत्रपती संभाजीनगर ते पैठण या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने याठिकाणची रहदारी पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. दि.१८ पर्यंत ही वाहतुक याच पर्यायी मार्गाने होणार आहे.
रहदारीतील बदल याप्रमाणे-
१.
कचनेर-निजलगाव-बिडकीन
डीएमआयसी- निजलगाव फाटा, बिडकीन मार्गे
छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने कचनेर- निजलगाव- बिडकीन डीएमआयसी एन्ड्युरन्स
कंपनीजवळून- शेकटा फाटा- बिडकीन मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जाईल.
२.
छत्रपती
संभाजीनगर- निजलगाव फाटा- बिडकीन- निजलगाव फाटा- बिडकीन डीएमआयसी- निजलगाव मार्गे
कचनेरकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर-निजलगाव फाटा-बिडकीन –शेकटा फाटा-
एन्ड्युरन्स कंपनी जवळून- बिडकीन डीएमआयसी – निजलगाव मार्गे कचनेरकडे जातील.
३.
वाळूज-
शेंदुरवादा- शेकटा- शेकटा फाटा- बिडकीन- निजलगाव फाटा- बिडकीन डीएमआयसी- निजलगाव
मार्गे कचनेरकडे जाणारी वाहने; वाळूज- शेंदुरवादा- शेकटा- शेकटा फाटा- एनड्युरन्स
कंपनी जवळून- बिडकीन डीएमआयसी- निजलगाव मार्गे कचनेरकडे जातील.
४.
कचनेर-
निजलगाव-बिडकीन डीएमआयसी- निजलगाव फाटा- बिडकीन- शेकटा फाटा- शेकटा- शेंदुरवादा
मार्गे वाळूज कडे जाणारी वाहने; कचनेर- निजलगाव- बिडकीन डीएमआयसी- एनड्युरन्स कंपनी
जवळून- शेकटा फाटा- शेकटा- शेंदुरवादा मार्गे वाळूजकडे जातील.
दि.१८ पर्यंत हे बदल लागू राहतील.
प्रतिबंधीत केलेल्या मार्गावर वाहनांची ये- जा बंद करण्यात आली आहे, असे पोलीस अधीक्षक
डॉ. विनयकुमार राठोड यांनी कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment