इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने राबविणार
छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने (Mahadbt Portal) राबविण्यात येणार आहे,असे सहायक संचालक दत्तात्रय वाघ यांनी कळविले आहे.
याअंतर्गत
खालीलप्रमाणे योजना राबविण्यात येणार आहेत.
इ.८
वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या विजाभज व विमाप्र मुलींना सावित्रीबाई फुले
शिष्यवृत्ती योजना, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना
गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रदाने विजाभज विमाप्र, माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या
विजाभज, विमाप्र विद्यार्थ्यांना शिक्षण फी, परीक्षा फी प्रदान करणे, इयत्ती ५ वी
ते ७ वी मध्ये शिकत असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले
शिष्यवृत्ती लागू करणे, इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या इतर मागास
प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करणे, इयत्ता १ ली
ते १० वी मध्ये शिकत असणाऱ्या डीएनटी इतर
मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती केंद्र पुरस्कृत
योजना.
या
सर्व योजना महाडीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत आणण्यात येत आहेत. महाडीबीटी
पोर्टलवर https://permatric.mahait.org/
०००००
Comments
Post a Comment