भूमि लोकअदालत दि.१३ रोजी
छत्रपती संभाजीनगर, दि.४ (जिमाका)- भूमि अभिलेख विभागाकडील नागरिकांच्या प्रलंबित अपील प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी सोमवार दि.१३ पासून भूमि लोकअदालत आयोजीत करण्यात आली आहे. भूमि अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी, छत्रपती संभाजीनगर येथे दि.१३ रोजी सकाळी ११ पासून ही लोकअदालत होईल. या लोकअदालतीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख डॉ. विजय वीर यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment