डॉ.आंबेडकर सभागृहात आज (दि.८) पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

 


छत्रपती संभाजीनगर, दि.७(जिमाका)-कौशल्य ,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने, देवगिरी शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थे जवळ असलेल्या वसतीगृहाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे बुधवार दि.८ रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

  मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर येथील नामांकीत  कंपनीचे  प्रतिनिधी उपस्थित राहून  मुलाखती घेणार आहेत. या रोजगार  मेळाव्यामध्ये   बीजी-ली-ईन इलेक्ट्रिकल्स लि., औरंगाबाद ऑटो ॲन्सीलरी प्रा.लि., एलिगन कॉम्पोनंट प्रा.लि., एक्सल प्लेसमेंट, सुदर्शन सौरशक्ती प्रा.लि., शिवशक्ती ॲग्रोटेक लि., पगारीया ऑटो प्रा.लि., साई सु्प्रिम इक्युपमेंट., नवभारत फर्टिलायजर, मायलन लेबॉरेटरी प्रा.लि., अलंकार इंजिनीअरींग ईक्युपमेंट प्रा.लि.., इत्यादी नामांकित नियोक्त्यांची उपस्थिती असेल. या मेळाव्यात कोणत्याही शाखेची पदवी, इंजिनीअरींग, डिप्लोमा, आय टी आय, एच एस सी, एस एस सी उतीर्ण इत्यादी पात्रताधारक युवक युवतींची आवश्यकतेनुसार निवड करण्यात येणार आहे. सर्व कंपन्या मिळून रोजगाराची ४७५ रिक्तपदे उपलब्ध असून विविध शैक्षणिक व व्यावसायीक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

 

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध रिक्तपदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्ड ने लॉग इन होऊन ऑनलाईन अप्लाय करावे किंवा बायोडाटाच्या ११ प्रती घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

 

संकेतस्थळावर नोंदणी करताना अथवा रिक्तपदासाठी अप्लाय करताना काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक ०२४०-२९५४८५९ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. मेळाव्यासाठी बुधवार दि.८ रोजी सकाळी साडे नऊ  वाजता कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून पात्रतेप्रमाणे विविध नियोक्त्यांकडे मुलाखती देवून रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा