आचारसंहिता क्षेत्रातील ७६ जणांना २४ तासांत शस्त्र जमा करण्याचे आदेश

 छत्रपती संभाजीनगर, दि.१४(जिमाका)-जिल्ह्यातील ज्या नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता सुरु आहे, त्याक्षेत्रातील शस्त्रपरवानाधारक ८८ पैकी ७६ जणांना २४ तासांत आपली शस्त्रे नजिकच्या पोलीस स्टेशनला जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

यासंदर्भात आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, पोलीस निरीक्षक संजय देशमुख आदी उपस्थित होते. सद्यस्थितीत निवडणूक आचारसंहिता सुरु असलेल्या सहा नगरपालिका व एक नगरपंचायत क्षेत्रात एकूण ८८ व्यक्ती शस्त्रपरवानाधारक आहेत.  त्यापैकी ७६ लोकांना शस्त्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्य १२ व्यक्तित ज्यांना त्यांचे शासकीय कर्तव्य म्हणून शस्त्र बाळगावे लागते त्यांचा समावेश आहे.  तरी या ७६ व्यक्तिंनी दि.१५ रोजी मध्यरात्री १२ वा. पर्यंत आपल्याकडील शस्त्र नजिकच्या पोलीस स्टेशनला जमा करावे,असे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक आदर्श आचारसंहितेचा भाग म्हणून शस्त्र जमा केले जात आहेत.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा