औद्योगिक वसाहतीत कामात व्यत्यय, गौण खनिजाचे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा-जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

 छत्रपती संभाजीनगर, दि.१९(जिमाका)- येथील औद्योगिक वसाहतीत अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन, तसेच उद्योग उभारणीच्या कामात व्यत्यय काही व्यक्तिंकडून होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा व्यक्तिंविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

            औद्योगिक वसाहतीत वितरीत भूखंडांतून अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन, तसेच उद्योग उभारणीच्या कामात काही व्यक्तिंकडून व्यत्यय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात  उद्योग संघटना, उद्योजक, परवानाधारक उत्खनक, खाण मालक , महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळ, ऑरिक सिटी, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी आदींची संयुक्त बैठक बोलावण्यात आली.

            जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, ऑरिक सिटीचे अरुण दुबे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, कार्यकारी अभियंता गिरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभितंता एस. के. चव्हाण, जिल्हा खनिकर्म अधिकारी दिनेश झांपले, उप अभियंता राजेश चव्हाण, मसिआचे उपाध्यक्ष राहुल मोगले,मनिष अग्रवाल आदी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, जिल्ह्यात औद्योगिक वसाहतीत आलेल्या उद्योगांच्या उद्योग उभारणीच्या कामात काही व्यक्ति  व्यत्यय निर्माण करीत आहेत. तसेच उद्योगाला वितरीत भूखंडातून अवैधरित्या गौण खनिज काढत आहेत. उद्योगांना उभारणीसाठी लागणारे मुरुम, खडी, दगड आदी चढ्या दराने देत आहेत, अशा विविध प्रकारच्या तक्रारी प्रापत झाल्या आहेत. अशाप्रकारे अवैध उत्खनन करणाऱ्या उत्खनकांना काळ्या यादीत टाकण्यात येऊन त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल. तसेच उभारणीच्या कामात वत्यय आणणाऱ्या व्यक्तिंविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज यंत्रणांना दिले.

०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा