बीजभांडवल व जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेसाठी अर्ज वाटपास सुरुवात
छत्रपती संभाजीनगर, दि.३(जिमाका)- सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सुधारीत बीजभांडवल योजना व जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना अंतर्गत कर्जप्रकरणे बँकांकडे शिफारस करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. या दोन्ही योजनांसाठी अर्ज वाटप व स्वीकृती प्रक्रिया दि. ३ नोव्हेंबर पासून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नियमितपणे सुरू राहणार आहे. इच्छुक उद्योजकांनी निर्धारित वेळेत अर्ज सादर करावे असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment