पैठण येथून युवक बेपत्ता, माहिती कळविण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि.१०(जिमाका) - मोबाईल विकून येतो असे सांगून घरातून गेलेला युवक बेपत्ता असल्याची नोंद पैठण पोलिसांत नोंदविण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुनिता उद्धव कणसे रा. गेस्ट हाऊस रोड, पैठण यांनी दिलेल्या खबरीनुसार, त्यांचा मुलगा अनिकेत वय २३ वर्षे हा दि.१९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मला पैशांची गरज असल्याने मोबाईल विकून येतो असे सांगून घरातून गेला तो परतला नाही. हरवलेल्या युवकाचे वर्णन याप्रमाणे- रंग सावळा, सडपातळ बांधा, उंची सहा फुट, अंगात क्रिम कलरचा टी शर्त, काळ्या रंगाची पॅण्ट, पांढरे शूज, उजव्या हातावर मॉम, डॅड असा टॅटू, डाव्या हातात साधे कडे व सोबत ॲपल कंपनीचा मोबाईल. त्यात एअरटेल कंपनीचे सिमकार्ड क्रमांक ९२८४६४६८३९ व ७७९६१०१७१५ वरील वर्णनाचा युवक आढळल्यास एम.बी. गोमारे पोलीस निरीक्षक मोबाईल क्रमांक- ९०४९९८०७५५, पोलीस हेड कॉन्स्टेबल आर.पी. जिवडे मोबाईल क्रमांक-८८८८८३७५६० तसेच पैठण पोलीस स्टेशन ०२४३१-२२३०३३ वर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
०००००

Comments
Post a Comment