शिकाऊ उमेदवारांसाठी सोमवारी (दि.१०) विशेष भरती मेळावा
छत्रपती संभाजीनगर, दि.६ (जिमाका)- शिकाऊ उमेदवारी अधिनियम १९६१ अंतर्गत शिकाऊ उमेदवारांसाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी विशेष भरती मेळावा आय.टी.आय.पास प्रशिक्षणार्थ्यांसाठी सोमवार दि.१० रोजी देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, स्टेशन रोड छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी १० वा. आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व औद्योगिक आस्थापना उपस्थित राहणार आहे. या मेळाव्यास उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र तसेच देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था डी. व्ही. वानखेडे यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment