जिल्हा ग्रंथालय कार्यालयात दिवाळी अंक प्रदर्शन
छत्रपती संभाजीनगर, दि.१०(जिमाका) - जिल्हा ग्रंथालय कार्यालय, राधामोहन कॉलनी खोकडपुरा येथे दिवाळी अंक प्रदर्शन लावण्यात आले आहे. गुरुवार दि.१३ पर्यंत हे प्रदर्शन वाचकांसाठी खुले राहणार आहे,असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे यांनी कळविले आहे. सेवनिवृत्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी ल. दि. कुमठेकर यांच्या हस्ते या प्रद्र्शनाचे उद्घाटन (दि.७) करण्यात आले. निरीक्षक ज्ञानेश्वर पेठणे, दि.ना.काळे, अनिल कांबळे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. दिवाळी अंक वाचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे यांनी केले आहे.
०००००

Comments
Post a Comment