निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला ३० नोव्हेंबरपूर्वी सादर करण्याचे आवाहन

 छत्रपती संभाजीनगर, दि.७(जिमाका)-जिल्हा कोषागारांतर्गत सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी आपले  निवृत्तीवेतन सुरु ठेवण्यासाठी दि.१ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत  आपला हयातीचा दाखला (Life Certificate) सादर करावा, असे सहायक संचालक (निवृत्तीवेतन) श्रीमती सुषमा अ. बुरकुळे यांनी कळविले आहे.

अशा प्रकारे सादर करता येईल हयातीचा दाखला

१.      निवृत्तीवेतनधारकांनी संबंधित बँकेत जाऊन यादीतील आपले नाव शोधून शाखा व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी करावी किंवा अंगठ्याचा ठसा उमटवावा. तसेच, पुनर्नियुक्तीची माहिती, आधार क्रमांक, पॅन क्रमांकमोबाईल क्रमांक यांची नोंद करावी.

२.       बायोमेट्रिक पद्धतीने ऑनलाईन हयातीचा दाखला सादर करण्यासाठी http://jeevanpramaan.gov.in  या संकेतस्थळावरही सुविधा उपलब्ध आहे. परदेशात राहणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना तेथील भारतीय राजदूतामार्फत हयातीचा दाखला जिल्हा कोषागार कार्यालयात पाठवता येईल.

३.      भारतीय डाक विभागाच्या Indian Post Payment Bank (IPPB) मार्फत सशुल्क डिजिटल हयातीचा दाखला ऑनलाईन सादर करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

तरी ज्यांची स्वाक्षरी अथवा अंगठा उमटवलेला नसेल किंवा ऑनलाईन जीवन प्रमाण दाखला सादर केलेला नसेल, त्यांचे डिसेंबर २०२५ चे निवृत्तीवेतन शासन निर्णयानुसार थांबविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

            वय वर्षे ८० वर्षांवरील कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी त्यांच्या वयाबाबतचा पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र) दि.१५ डिसेंबर पूर्वी वरिष्ठ कोषागार कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे सादर करावे, असे सहायक संचालक (निवृत्तीवेतन) श्रीमती सुषमा अ. बुरकुळे यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा