मुंग, उडीद व सोयाबीन खरेदी प्रक्रिया सुरू
छत्रपती संभाजीनगर, दि.६(जिमाका) -महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेड कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मुग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी नोंदणी प्रक्रिया दि. ३० ऑक्टोबरपासून सुरू झाली असून, प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया दि. १५ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे,असे जिल्हा पणन अधिकारी व्ही.यु. राठोड यांनी कळविले आहे.
केंद्र शासनाने मुंग,
उडिद व सोयाबीन खरेदीकरीता मुंग – ८ हजार ७६८ रुपये प्रति क्विंटल, उडिद – ७ हजार ८००
रुपये प्रति क्विंटल, सोयाबीन – ५ हजार ३२८ रुपये प्रति क्विंटल दर निश्चित केले
आहे.
केंद्रीय नोडल एजन्सी
नाफेड मार्फत खरेदी केंद्र जाधववाडी येथे तालुका शेतकरी खरेदी विक्री संघ लि.,
फुलंब्री तालुका सहकारी
खरेदी विक्री संघ लि., ता. फुलंब्री,
वैजापूर तालुका सहकारी
खरेदी विक्री संघ लि., ता. वैजापूर,
खुलताबाद तालुका सहकारी
खरेदी विक्री संघ.लि, ता. खुलताबाद,
गंगापूर तालुका सहकारी
खरेदी विक्री संघ लि,. ता. गंगापूर,
सिल्लोड तालुका शेतकरी
सहकारी खरेदी विक्री संघ लि., ता. सिल्लोड,
सोयगाव तालुका सहकारी
खरेदी विक्री संघ लि., ता. सोयगाव,
कन्नड तालुका शेतकरी
सहकारी खरेदी विक्री संघ लि., ता. कन्नड,
पाचोड, संत ज्ञानेश्वर
कृषी सेवा सहकारी संस्था मर्या.,
इ. संस्थेमार्फत खरेदी
केली जाणार आहेत.
शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी
जवळच्या नाफेड खरेदी केंद्रावर जाऊन सातबारा उतारा, आधारकार्ड आणि बँकेचे पासबुक
सादर करून आपल्या पिकाची नोंदणी करून घ्यावी.
नोंदणी ही ऑनलाईन
पद्धतीने POS मशिनद्वारे केली जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः उपस्थित राहणे
आवश्यक आहे. खरेदीसाठी संदेश प्राप्त झाल्यानंतरच शेतमाल खरेदी केंद्रावर आणावा, असे
कळविण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment