सैनिकी सेवापुर्व शिक्षण संस्थेत शारिरीक प्रशिक्षण निदेशकाची आवश्यकता

 छत्रपती संभाजीनगर, दि.१८(जिमाका)- मुलींच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था नाशिक येथे महिला शारिरीक प्रशिक्षण निदेशकाची आवश्यकता आहे. एका पदावर ही भरती होणार असून ही अशासकीय भरती निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात व कंत्राटी पद्धतीने असेल. वसतीगृहात राहण्यास इच्छुक असावे. शारिरीक शिक्षण या विषयात पदवी वा पदव्युत्तर शिक्षण झालेल्या महिला उमेदवारांनी अर्ज करावा. अर्ज व आवश्यक कागदपत्रासह अर्जदारांनी मंगळवार दि.२७ रोजी सकाळी ११ वा. सैनिकी सेवापुर्व शिक्षण संस्था एन १२ सेक्टर, सिडको, छत्रपती संभाजीनगर येथे उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी  मुलींची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था येथे ९७०३५४८४५७ व ९८५०५२५६३६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संचालक निवृत्त कर्नल मकरंद देशमुख यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा