राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम योग्य प्रतिनिधीत्वासाठी मतदानाचा टक्का वाढणे आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 






छत्रपती संभाजीनगर, दि.27(जिमाका)  लोकप्रतिनिधीत्व अधिनियमानुसार अपेक्षित लोकप्रतिनिधीची निवड करण्यासाठी आपण मतदान करतो. मात्र मतदानाची टक्केवारी कमी असल्यास कमी लोकांचा प्रतिनिधी आपण निवडतो. जास्तीत जास्त लोकांना प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदानाचा टक्का अधिक असणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.

          राष्ट्रीय मतदान दिवस (दि.25) निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा नियोजन भवनात हा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थितांना मतदारांची प्रतिज्ञा देण्यात आली.       तसेच इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ  फुड सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थिनींनी मतदार जागृती संदर्भात पथनाट्य सादर केले. तसेच नव मतदारांना मतदान ओळखपत्राचे वितरण, ज्येष्ठ मतदार व महिला मतदारांचा सत्कार करण्यात आला.

          जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, महिला मतदारांच्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ होणे आवश्यक आहे. लोकांना मतदान हा अधिकार दिला आहे. आपण आपले अधिकार, हक्कांबाबत जागरुक असतो मात्र कर्तव्यासाठीही जागरुक व्हावे,असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविक देवेंद्र कटके यांनी केले तर अनिता खुने यांनी आभार मानले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा