हिंद दी चादर गुरु तेग बहादुर साहेब यांचे ३५० वे शहीदी समागम वर्ष जिल्ह्यातील २७८९ शाळांमध्ये दररोज प्रभात फेऱ्यांद्वारे जनजागृती

 






            छत्रपती संभाजीनगर, दि.२२(जिमाका)- हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीद समागम वर्षानिमित्त त्यांचे कार्य व इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी शाळांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात विविध शाळांमध्ये माहितीपट प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, प्रभात फेरी आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. जिल्ह्यातील २७८९ शाळांमध्ये दररोज प्रभात फेऱ्या आयोजीत करुन जनजागृती केली जात आहे, अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य.) आश्विनी लाठकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील एकूण ३०७४ प्राथमिक शाळांपैकी २८९२ शाळेत प्रभात फेऱ्या घेतल्या आहेत, तर त्यातील २७८९ शाळेत दररोज प्रभात फेऱ्या घेण्यात येतआहेत. शिक्षणविभागाच्या माध्यमिक विभागाच्या एकूण १२७७ शाळांपैकी ११०२ शाळांचा तर  उच्च माध्यमिक विभागातील१५७ शाळांपैकी १४१  शाळांचा या उपक्रमात सहभाग आहे. तसेच २८९२ प्राथमिक शाळांमध्ये श्री गुरु तेग बहादुर साहेब जी यांच्या जीवनावर स्पर्धा परीक्षा आयोजीत करुन  गीत व डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. तर ११०२ माध्यमिक शाळेत व १४१  उच्च माध्यमिक शाळेत गुरुतेग बहादुर साहेबजी यांच्या जीवनावर स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या गीत व डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. तालुकास्तरीय स्पर्धा मंगळवार दि.२० रोजी संपन्न झाल्या असून आणि आज जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचे  निकाल संकलित करणे सुरू आहे. आज घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये गायन,चित्रकला,निबंध स्पर्धा,वकृत्व स्पर्धा व स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या. या स्पर्धांमधून गुरु तेग बहादूर यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती मिळून जनजागृती होत आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा