बेपत्ता महिलेची माहिती कळविण्याचे आवाहन

 



छत्रपती संभाजीनगर, दि.22(जिमाका)- सिटी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील एक महिला दि.20 जानेवारी पासून राहत्या घरातून कोणासही न सांगता निघुन गेल्याने बेपत्ता झाली आहे, यासंदर्भात या महिलेचा पती शफिक शाह सलिम शाह रा. जुन आबाजअर,पोस्ट ऑफीससमोर नूर कॉलनी , छत्रपती संभाजीनगर यांनी सिटी चौक पोलीस स्टेशन मध्ये खबर दिली. त्यानुसार फातेमा बेगम शफिक शाह वय 21 वर्षे ही महिला रंग गोरा, बांधा मध्यम, उंची 5 फुट 2 इंच, नाक सरळ, डोळे काळे, चेहरा गोल, केस काळे, हिंदी भाषा बोलते, अंगात ग्रे रंगाची सलवार त्यावर पांढ़ऱ्या रंगाचा फुले असलेला टॉप व काळ्या रंगाचा बुरखा  , पायात काळ्या व पांढऱ्या रंगाची सॅंडल, सोबत आधार कार्ड, टीसी, फोटो, पॅन कार्ड, मतदान कार्ड असलेली गुलाबी रंगाची स्कूल बॅग, शिक्षण 5 वी, सोबत ओप्पो कंपनीचा मोबाईल. वरील वर्णनाच्या महिलेबाबत माहिती आढळल्यास सिटी पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार सुधाकर मिसाळ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा