सशस्त्र सेवा ध्वजदिन निधी संकलनाचा उद्या (दि.२१) प्रारंभ

 छत्रपती संभाजीनगर, दि.१८(जिमाका)- सशस्त्र सेवा ध्वजदिन निधी २०२५ च्या संकलनाचा शुभारंभ बुधवार दि.२१ रोजी सायं.५ वा. मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र, येथील सभागृहात होणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून जिल्ह्यातील सर्व वीरमाता, वीरपत्नी, वीरपिता, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या पत्नी व अवलंबित यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीमती मेजर सैय्यदा फिरासात यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा