महाराष्ट्र ग्रामसामाजिक परिवर्तन अभियान; गांधेली येथे वृक्ष लागवड कामांची पाहणी


 






छत्रपती संभाजीनगर, दि.५(जिमाका)-  गांधेली ग्रामपंचायत अंतर्गत साई टेकडी परिसरात महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन (MVSTF) मार्फत केलेल्या एक लक्ष ४५ हजार वृक्ष लागवड व जलसंधारण उपक्रमांची पाहणी  आज (दि.५) करण्यात आली. गट विकास अधिकारी श्रीमती मिना रावतळे यांनी ही पाहणी केली.

            या अंतर्गत साई टेकडी परिसरात वृक्ष लागवड, रोपांची गुणवत्ता, वाढ व दीर्घकालीन टिकाव, सिंचन, संरक्षण व नियमित देखभाल व्यवस्था, जलसंधारणाची विविध कामे व त्यांचा भूजलस्तरावर होणारा सकारात्मक परिणाम, ग्रामपंचायत गांधेली व स्थानिक समुदायाचा सक्रिय सहभाग यासह उपक्रमाच्या नियोजन, अंमलबजावणी व प्रत्यक्ष परिणामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या उपक्रमामुळे साई टेकडी परिसरात हरित आच्छादनात लक्षणीय वाढ, पर्यावरणीय संतुलन, तसेच पर्यटन स्थळाच्या नैसर्गिक सौंदर्यात भर पडत आहे. वृक्षलागवड आणि जलसंधारणाचा समन्वय हा शाश्वत पर्यावरणीय व पर्यटन विकासाचा आदर्श नमुना ठरत आहे. जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन (MVSTF) व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे पर्यावरण संवर्धन, जलसुरक्षा, जैवविविधता संरक्षण आणि स्थानिक विकास य्चे दृष्य परिणाम दिसत आहेत.पाहणी दरम्यान कृषी अधिकारी दिनकर जाधव, विस्तार अधिकारी सोळशे, सरपंच मन्नू शेख, ग्रामपंचायत अधिकारी सलोनी खरात, अभियान सहयोगी दयानंद माने, जिल्हा कार्यक्रम समन्वयक किरण बिलोरे, प्रकल्प समन्वयक सतीश खंदारे, अमोल कुटे, रवी वाघमोडे, जलदूत महेश तळेकर यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा