जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ग्रंथप्रदर्शन
छत्रपती संभाजीनगर, दि.२२(जिमाका)-
"मराठी भाषा संवर्धन पंधरवडा " निमित्त
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचे
उदघाटन माजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी ल.दि.कुमठेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना त्यांनी मराठी साहित्य, भाषेची उत्पत्ती
,विकास तसेच मराठी भाषेस अभिजात दर्जा बदËदल उपस्थिताना माहिती दिली. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय
अधिकारी सुभाष साबळे यांनी केले, उपस्थितांना
प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या ग्रंथाची माहिती देऊन अभ्यास करतांना वाचनाचे महत्व विशद केले. ग्रंथ प्रदर्शन दि.२८ तारखेपर्यंत सर्वांसाठी खुले
आहे. तरी सर्व नागरिकांनी ग्रंथ प्रदर्शनाचा व या ग्रंथालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन
त्यांनी केले. यावेळी अभ्यासिकेतील विद्यार्थी, वाचक/सभासद व कार्यालयातील कर्मचारी
उपस्थित होते.सूत्रसंचलन तांत्रिक सहाय्यक दीपक काळे यांनी केले व आभार प्रदर्शन ग्रंथालय
निरीक्षक ज्ञानेश्वर पैठणे यांनी केले.
०००००

Comments
Post a Comment