पैठणी विणकाम प्रशिक्षण;दि.३० पर्यंत अर्ज मागविले

 


छत्रपती संभाजीनगर, दि.१६ (जिमाका)- महाराष्ट्र लघुउद्योग महामंडळांतर्गत मऱ्हाटी पैठणी केंद्र, संत ज्ञानेश्वर उद्यान रोड, पैठण यांच्या तर्फे  भरजरी पैठणी विणकाम प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी इच्छुक प्रशिक्षणार्थींकडून शुक्रवार दि.३० पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. या प्रशिक्षणासाठी ३० प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात येणार असून  प्रशिक्षण कार्यक्रम सहा महिने कालावधीचा आहे. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थीस दरमहा २१०० रुपये प्रशिक्षण भत्ता देण्यात येणार आहे. यापुर्वी प्रशिक्षणाचा लाभ न घेतलेल्या किमान लिहिता वाचता येणाऱ्या, वय वर्षे १८ ते ३५ दरम्यान स्त्री पुरुष उमेदवारांनी  प्रशिक्षणासाठी अर्ज करावा. प्रशिक्षणार्थींची निवड ही समितीमार्फत मुलाखत घेऊन करण्यात येईल,असे व्यवस्थापक मऱ्हाटी पैठणी केंद्र यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा