करियर निवडीसाठी मानसशास्त्रीय मार्गदर्शन कार्यशाळा

 


छत्रपती संभाजीनगर, दि.13(जिमाका):- मानशास्त्रीय चाचण्यांच्या आधारे योग्य करिअरची निवड कशी करावी याविषयी कार्यशाळा आज छत्रपती संभाजी कॉलेज ऑफ कॅम्प्युटर सायन्स, सिडको, छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झाली. मार्गदर्शक म्हणून श्रम व रोजगार मंत्रालयाचे समुपदेशक डॉ.अनिल जाधव यांनी काम पाहिले. सुमारे 4 तास चाललेल्या या कार्यशाळेमध्ये जागतिक स्तरावर वापरली जाणारी इंटरेस्ट प्रोफाईल IP ही  कलचाचणी करण्यात आली. चाचणीमधुन त्यांना भारतातील एकुण मुख्य 52 करिअरच्या क्षेत्रापैकी एक असलेल्या माहिती तंत्रज्ञान IT या क्षेत्रातील उपलब्ध असणाऱ्या शेकडो जॉब रोल पैकी आपल्याशी संबंधित जॉब रोल निवडायला मदत होईल. तसेच,वर्क इम्पॉर्टस लोकेटर WIL ही चाचणी आपल्या कामाच्या ठिकाणी असलेली व्हॅल्यु ओळखण्यासाठी जागतिक स्तरावर वापरल्या जाते. याद्वरे विदयार्थ्यांना स्वत:च्या वर्किंग व्हॅल्युज आणि त्याद्वारे निवडायचा जॉब रोल याविषयीची क्लियारिटी नेमकेपणा करिअर पथ निवडताना येतो. तसेच या कार्यशाळामध्ये जगभरातील नामांकिंत अशा विद्यापीठ,महाविद्यालय शाळांमध्ये वापरल्या जाणारी MBTI  नावाची  चाचणी ही करण्यात आली. या चाचणीमुळे विद्यार्थ्यांना स्व ओळख आपल्या व्यक्तिमत्वातील वेगवेगळे पैलू ओळखण्यास मदत झाली. महाविद्यालयातील सुमारे 25विदयार्थ्यांनी या मानसशास्त्रीय चाचण्यांद्वारे भविष्यातील करिअर विषयक निर्णय घेण्यासाठी  वैज्ञानिक दृष्टिकोनातून सपोर्ट करणाऱ्या नामांकित मानसशास्त्रीय चाचण्याच्या आधारे मार्गदर्शन मोफत मिळाले. कौशल्य विकास विभागाच्या उपायुक्त श्रीमती विद्या शितोळे व सहायक आयुक्त राजू वाकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. या उपक्रमासाठी  महाविद्यालयाचे संचालक वडकर,प्राचार्य सपना थोरात यांचे सहकार्य लाभले.

00000

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा