डाक विभागाच्या आउटलेटसाठी प्रस्ताव मागविले

 


 छत्रपती संभाजीनगर, दि.८(जिमाका)-भारतीय डाक विभागाकडून खासगी  व्यक्तींना फ्रँचायझी आउटलेट चालविण्याची  उत्कृष्ट व्यवसाय संधी देण्यात येणार असून त्यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

          या योजनेअंतर्गत फ्रँचायझीधारकांना सर्व प्रकारच्या डाक वस्तूंचे बुकिंग करण्याचा अधिकार देण्यात येईल. यासाठी दैनिक व मासिक स्वरुपात आकर्षक कमिशन मिळणार आहे. कमी गुंतवणुकीत आणि शासकीय पाठबळासह हा व्यवसाय स्थिर व विश्वासार्ह उत्पन्नाचा स्त्रोत ठरु शकतो.

या फ्रँचायझी योजनेचे फायदे:

·        विश्वसनीय व प्रतिष्ठित शासकिय संस्थेशी  संलग्नता

·        आकर्षक कमिशन रचना

·        डाक सेवांची  वाढीची  संधी

·        डाक विभागाकडून आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य

 या उपक्रमाचा उद्देश डाक सेवांचा विस्तार करणे, नागरिकांना अधिक सोयीस्कर सेवा  उपलब्ध करुन देणे हा आहे.

इच्छुक कुरिअर सेवा पुरवठादार व व्यक्तींनी आपले अर्ज प्रवर डाक अधीक्षक छत्रपती संभाजीनगर टपाल विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे पाठवावे, अधिक माहितीसाठी 0240-2970610  या क्रमांकावर संपर्क साधावा.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा