जिल्हा कौशल्य विकास केंद्रातर्फे उद्या(दि.१८)रोजगार मेळावा

 


छत्रपती संभाजीनगर, दि.१६(जिमाका)- शासनाच्या कौशल्य विकास,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने बुधवार दि.१८ रोजी ‘जागेवर निवड संधी’ या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन  केंद्र, मध्यवर्ती  बसस्टँड रोड,  मालजीपुरा छत्रपती  संभाजीनगर  येथे सकाळी १० वा. हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

            या मेळाव्यात औरंगाबाद ऑटो ॲन्सीलरी प्रा.लि., युवान ईलेक्ट्रीकल्स प्रा.लि,  इंडसलंड जनरल इंशुरन्स इ. नामांकीत नियोक्त्यांना कोणतीही पदवी/ डिप्लोमा- मेकॅनिकल/इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक, आय टी आय - ऑल ट्रेड, एच एस सी, एस एस सी उतीर्ण इत्यादी पात्रताधारक उमेदवारांसाठी रोजगाराची साधारण पणे १५७  रिक्तपदे उपलब्ध असून विविध शैक्षणिक व व्यावसायीक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

            या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध रिक्तपदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्ड ने लॉग इन होऊन ऑनलाईन अप्लाय करावे किंवा बायोडाटाच्या पाच प्रती घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

 

संकेतस्थळावर नोंदणी करताना अथवा रिक्तपदासाठी अप्लाय करताना काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी क्रंमांक 0240-2954859 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. बुधवार दि.१८ रोजी  सकाळी १० वाजता कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून पात्रतेप्रमाणे विविध नियोक्त्यांकडे मुलाखती देवून रोजगार संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा