जि.प.;पं.स.निवडणूकःमतमोजणी केंद्राच्या १०० मिटर परिसरात मनाई आदेश
छत्रपती संभाजीनगर,
दि.३(जिमाका)-
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीची मतमोजणी सोमवार दि.९ रोजी होणार आहे.मतमोजणी
प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पडावी यासाठी
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी दिलीप स्वामी यांनी मतमोजणी केंद्र व त्याच्या
१०० मिटर परिसरात मनाई आदेश जारी केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रांच्या
१०० मिटर परिसरात कोणत्याही व्यक्तिस वाहन व मोबाईल घेऊन जाण्यास मनाई केली आहे. तसेच
ध्वनिक्षेपक बंद ठेवणे, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी कर्मचारी;
उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी, उमेदवारांनी मतमोजणीसाठी प्राधिकृत केलेली व्यक्ती तसेच निवडणूक आयोगाने, जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक
निर्णय अधिकारी यांनी परवानगी दिलेल्या व्यक्ति व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस
मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मतमोजणीच्या
दिवशी म्हणजेच दि.९ रोजी सकाळी ७ ते मतमोजणी संपेपर्यंत हे आदेश अंमलात असतील असे जिल्हाधिकारी
स्वामी यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
०००००
Comments
Post a Comment