छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
छत्रपती संभाजीनगर, दि. 19 (जिमाका) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396 व्या जयंतीनिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी संभाजी
अडकुणे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार
संजय शिंदे, महसुल सहायक प्रेमसिंग राजपुत यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील
अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
000000

Comments
Post a Comment