अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या महसूल विभागाच्या कार्यालयांना भेटी व पाहणी

 






छत्रपती संभाजीनगर, दि. 20 (जिमाका) – राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे महसूल विभागाशी संबंधित सर्व कार्यालयांना भेटी देऊन पाहणी केली व सविस्तर आढावा घेतला.

 मराठवाडा महसूल प्रबोधिनी, भूमिअभिलेख प्रशिक्षण केंद्र, उपअधीक्षक भूमिअभिलेख, उपसंचालक भूमिअभिलेख, महसूल नोंदणी व मुद्रांक विभाग, नगररचना विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे श्री.खारगे यांनी आज भेटी दिल्या.

यावेळी अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, उपसंचालक किशोर जाधव, उपअधीक्षक भूमिअभिलेख डॉ. विजय वीर, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, नोंदणी विभागाचे उपमहानिरीक्षक विजय भालेराव, सहनिबंधक विवेक गांगुर्डे, सहनिबंधक जालना रामेश्वर रोडगे, भूमिअभिलेख प्रशिक्षण केंद्राचे निर्देशक अविनाश शिंगणे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकी दरम्यान सर्व कार्यालय प्रमुखांना महसूल प्रकरणे निर्धारित कालमर्यादेत निकाली काढण्याचे निर्देश दिले.

नागरिकांना पारदर्शक व वेळेत सेवा मिळावी यासाठी ई-ऑफिस व ऑनलाइन प्रणालीचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात आला.

भूमिअभिलेख विभागास भेट देताना विविध प्रलंबित प्रकरणे, नकाशे अद्ययावत करणे, ई-मोजणी, डिजिटल रेकॉर्ड व्यवस्थापन तसेच नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. भूमि अभिलेख प्रशिक्षण केंद्राच्या भेटीदरम्यान नवीन भरती कर्मचाऱ्यांसाठी नियमित व अद्ययावत प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, डिजिटल सर्व्हे, ड्रोन मॅपिंग व ई-नकाशा प्रणालीसंदर्भात विशेष कार्यशाळा आयोजित करणे तसेच प्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी तांत्रिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रलंबित मोजणी प्रकरणे निश्चित कालमर्यादेत निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले. फेरमोजणी व सीमांकन प्रकरणात पारदर्शकता राखावी तसेच नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी विशेष पथक कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तसेच उपसंचालक भूमि अभिलेख कार्यालयास मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांच्या कामकाजाचा नियमित आढावा घेऊन प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा, डिजिटल नोंदींची पडताळणी करून अद्ययावत माहिती प्रणालीत नोंद करावी व शासकीय जमिनींचे नकाशे आणि अभिलेख सुरक्षित व संगणकीकृत स्वरूपात जतन करावेत, असे निर्देश खारगे यांनी दिले.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा